Skip to main content

Posts

Showing posts with the label Marathi

फाय स्टार टपरी

         महेश बाबुराव भोसले आणि विशाखा गणेश सहस्त्रबुद्धे यांची प्रेम प्रकरणाची सुरुवात झाली मुंबईच्या प्रत्येक आय. टी कंपन्यांच्या बाहेर असणाऱ्या टपर्यावर. या निळ्या ताडपत्राखाली टेबल-खुर्ची असलेल्या रस्त्यावरच्या हॉटेल ला टपरी म्हणता येणार नाही पण तिथे लावलेला बोर्ड “फाय स्टार टपरी” असाच म्हणतो. त्या आय. टी कंपन्याच्या अवती पांडुरंग फडके महाविध्यालय व भवती न्यू-इंग्लिश हाय स्कूल अशी दोन ज्ञानभंडार होती. या कथेला आय. टीची भणक लागले ते फक्त एवढेच.      इयत्ता ‘अकरावी ब’ चा महेश दररोज सकाळी ९ वाजता शाळा सुरु होण्यापूर्वी टपर्यावर चहा आणि बन-मस्का खातो. खाता-खाता टपरीवाला रहीमशी गप्पा मारतो. एक दिवशी बन-मस्का खातांना या कथेची नायिका अर्थात Standard ‘9 th C’ ची विशाखा तिथे आली. तिने एक बन-मस्का मागितला. सगळ्या खुर्च्या भरल्या होत्या म्हणून रहीमने महेशला उठून विशाखाला जागा देण्यासाठी सांगितले पण ज्या क्षणापासून त्या टपर्यावर विशाखा अवतरली, अगदी त्याच क्षणापासून विशाखाच्या महिमेत महेश  दंग  झाला होता. त्याला कशाचाही भान नव्हता....

बगिचा

"ए झिपऱ्या, पाटील बोलावतोय तुला", मावशी ओरडली . माझं नाव सदाशिव सोनोपंत माने. मला सगळे लोक प्रेमाने किवा रागाने ' झिपऱ्या ' असं म्हणतात . मी पण प्रेमाने किवा रागाने 'होऽऽ' असं उत्तरतो. पाटल्याचा नेहमीचा असतं काहीतरी काम - ''दूध आण" - ''कुत्र्याला फिरवून आण" - "हे आण ते आण", नुसता कटकट आहे हा पाटील. मी नाही जाणार आज त्या पाटलाकडे, मारू द्या बोंबा. मावशी परत आली . तिला पाहताच पटकन बोललो, "ए मावश्या, मला नाही जायचं त्याच्याकडे. मी नाही जाणार. या पुढे त्याचं काहीही काम असेल तर मला नको बोलत जाऊ." मग काय? दोन फटके मारून पाठवलाच मला त्या पोपटाकडे. मार खातांना राधा पण होती तिकडेच. मावशी पण येडी आहे. राधा समोर का मारायचं मला? राधा आणि मी शाळेत एकत्र आहोत. नऊवीत. राधा याच वर्षी गावात आली. पुण्यात रहायची आतापर्यंत. मला राधा खूप आवडते. जितका सहजतेने हे मी तुम्हाला सांगितलं, तितकाच कठीण आणि असंभव वाटतं जेव्हा तिला हीच बात बोलायचा प्रयत्न करतो. तिला पहिल्यांदा शाळेत पाहिला तेव्हाच मी ठरवलं की लग्न करेन तर हि...