"ए झिपऱ्या, पाटील बोलावतोय तुला", मावशी ओरडली . माझं नाव सदाशिव सोनोपंत माने. मला सगळे लोक प्रेमाने किवा रागाने ' झिपऱ्या ' असं म्हणतात . मी पण प्रेमाने किवा रागाने 'होऽऽ' असं उत्तरतो. पाटल्याचा नेहमीचा असतं काहीतरी काम - ''दूध आण" - ''कुत्र्याला फिरवून आण" - "हे आण ते आण", नुसता कटकट आहे हा पाटील. मी नाही जाणार आज त्या पाटलाकडे, मारू द्या बोंबा. मावशी परत आली . तिला पाहताच पटकन बोललो, "ए मावश्या, मला नाही जायचं त्याच्याकडे. मी नाही जाणार. या पुढे त्याचं काहीही काम असेल तर मला नको बोलत जाऊ." मग काय? दोन फटके मारून पाठवलाच मला त्या पोपटाकडे. मार खातांना राधा पण होती तिकडेच. मावशी पण येडी आहे. राधा समोर का मारायचं मला?
राधा आणि मी शाळेत एकत्र आहोत. नऊवीत. राधा याच वर्षी गावात आली. पुण्यात रहायची आतापर्यंत. मला राधा खूप आवडते. जितका सहजतेने हे मी तुम्हाला सांगितलं, तितकाच कठीण आणि असंभव वाटतं जेव्हा तिला हीच बात बोलायचा प्रयत्न करतो. तिला पहिल्यांदा शाळेत पाहिला तेव्हाच मी ठरवलं की लग्न करेन तर हिच्याशीच नाही तर नाही करणार. ती मला झिपऱ्या नाही म्हणत - 'सदा' म्हणून हाक मारते. प्रेमानेच बोलत असेल. ती हसते तेव्हा तिच्या गालांवर खड्डे पडतात. मला ते खूप आवडतात. ती नेहमी शाळेत दोन शेंड्या घालून येते. त्या शेंड्यांना खेचून तिची चेष्टा करतो कधी कधी. ती चिडते तेव्हा आणखी गोड वाटते. राधा आहेच गोड म्हणून मला ती आवडते.
"झिपऱ्या, बाजारातून फुलं आण थोडी. नेमकं चतुर्थीला नाही आला हारवाला. त्याला पण बघून ये जरा. देव जाणे कुठे मरून पडला आहे." एकदा मोठं होऊन या पाटल्याचा कानाखाली दिला नाही नं, तर नावाचा सदा नाही मी. तोंड वाकडं करून बाजाराकडे निघालो तेव्हा रस्त्यात राधा दिसली. मी पळत गेलो तिच्या जवळ. "कुठे जातेस एकटी?", मी विचारलं. "आजोबांना फुलं हवी आहेत पूजा करायला. आज चतुर्थी आहे ना.", ती बोलली. "माहिती आहे मला, मी पण फुलं आणण्यासाठी जातो आहे बाजारात." असं बोललो तिला. तिला खूष करायला पूजा पण मीच करणार आहे, असं खोटं पण सांगितला. फुलांच्या दुकानात तिला एक गुलाबाचं फुलं घेऊन दिला.ती आवडते म्हणून सांगायची हिम्मत झाली नाही ती बात नवीन नाही आहे.
तशी आमची मित्र मंडळी सगळी छपरीच. मुलींना पाहून आम्हाला फक्त त्यांची टिंगल करायची आवड. प्रेम वगैरे माहित नहीं आम्हाला. मी आता छपरी नही आहे. राधाला पाहिल्यानंतर मी खूप बदललो असे माझे मित्र म्हणतात. "झिपऱ्या, चल की बगिच्यात, थोड़ी मस्ती करू", माझे मित्र ओरडले. आम्ही बगिच्यात जाऊन नेहमी तिकडे बसणारे प्रेमी युगुलांवर दगड टाकायचो. नेमकी एवढा वेळ त्या बगिच्यात बसून काय बोलत असतात हे मला कधीच समजला नाही. मी राधाला बगिच्यात कधीच घेऊन जाणार नही. राधाला मी मोटारीवर बसवून शहरात नाटक पहायला घेऊन जाणार . त्यानंतर थोडं खाऊन परत घरी जाणार. मस्त ना? आणि हो, निरोप घेताना एक लाल गुलाब देणार तिला - नाही सकाळी निघतानाच देणार - नाही दोन्ही वेळा देणार. "सदा कशाचा विचार चाललं आहे?" राधा बगिच्यात कधी आली हे मला कळालच नाही. आतापर्यंत जे विचार करत होतो ते मी बोलत तर नव्हतो ना? असं असेल तर राधाने माझं बोलणं ऐकलं असेल का?
"इकडे का आली तू?", मी ओरडलो तिच्यावर. तिने अजून जोरात मला विचारलं. "काकांचा बगिचा आहे का तुमचा?" तिचा असं बोलणं ऐकून मला खूप हसायला आलं. दोघे जोरजोरात हसत होतो. "काय विचार करत होता?", तिने मला परत विचारलं. "आज बोलून टाकतोच!" असं विचार करून बाजूला असलेल्या गुलाबाच्या झाडावरून दोन फुलं तोडली आणि तिच्या डोळ्यात पाहून म्हणालो, "राधे, मला तू खूप आवडतेस" असं म्हणताच कानाखाली दोन चापट्या पडल्या. राधा पळून गेली. "फुलं का तोडली झाडावरून?", बगीचेचा माळीने विचारलं. एका हातात ते दोन फुलं आणि दुसरा हात गालावर ठेवून मी विचार करत होतो की राधा समोर असतानाच का मला मारतात लोकं? थोडा वेळ थांबलं असतं की तिने तिच्या मनातल्या बात बोलले असते, मग हा फाटक्या तोंडाचा माळीने मला लाता जरी घातल्या असता तर मला काहीच दुख झाला नसता. हातातली फुलं त्याला देऊन मी तिकडून निघून गेलो.
दुसऱ्या दिवशी शाळेत जायचं धाडस मला झालं नाही म्हणून दफ्तर घेऊन सरळ बगीच्यात जाऊन बसलो. इतिहासाचा एक पाठ वाचायला घेतला पण फार काही वाचून झाला नाही. "सदा, शाळेत का रे नाही आलं आज?" राधा होती. पहिला वर्ग बसून आली ती कदाचित.
"काल खूप घाबरले होती मी म्हणून पळाळे"
"शाळेत का नाही गेलीस आज?"
"गेली होती पण तुझ्याशी झरा बोलायचा होतं"
"काय बोलायचं होतं?"
"सदा, मला सुध्धा आवडतोस तू", ती लाजून म्हणाली. लाजून हसतांना परत तिच्या गालांवर खड्डे आले. जोरात मिठी मारलं तिला मी. दोन फुलं तोडून दिलं मी तिला.
दुरून माळी आणि मावशी पळत येत होते आमच्याकडे. फुलं तोडली म्हणुं माळी येत होता ते समजलं. पण मावशी? "ए झिपऱ्या, शाळेत का नी गेला", मावशी रागाने धावताच ओरडत होती. "परत फुलं तोडले तू. तुझी खैर नाही आता", माळी अजून जोरात ओरडत आणि पळत होता. "घरात गेली होती मी अगोदर. मला वाटलं तू घरीच असणार. मावशी काळजी करत होती म्हणून मीच सांगितलं तू इकडे असशील म्हणून", राधाने माझी टिंगल उडवत सांगितलं. "अरे बघतेस काय मग, पळ!", आम्ही दोघे धावत सुटलो.
आमचं प्रेम बगिच्यात फुललं म्हणून आम्ही खूप वेळा आणि खूप वेळ बगिच्यात बसून गप्पे मारतो. नाटकं पाहायला शहरात सुध्धा जातो पण हे बाकीचे प्रेमी आमच्या बगिच्यात काय करत असतात हे मला अजून समजलेलं नाही आहे.
wowww...
ReplyDeletemast hai ye pyar ki daastan
lay bhari ....
ReplyDeletemast re......:)
ReplyDelete:) thank u!
ReplyDeleteparpelli.....has an extraordinary talent for turning notoriety into gold,& telling fast moving stories....!
ReplyDeleteThanks for the extraordinary comment Kunal!!
ReplyDeletelay bhari aavdala rav applyala pan radha ani sada cha baghicha
ReplyDeletedhanyavaad rav!
ReplyDelete