Skip to main content

Posts

Showing posts from February, 2013

फाय स्टार टपरी

         महेश बाबुराव भोसले आणि विशाखा गणेश सहस्त्रबुद्धे यांची प्रेम प्रकरणाची सुरुवात झाली मुंबईच्या प्रत्येक आय. टी कंपन्यांच्या बाहेर असणाऱ्या टपर्यावर. या निळ्या ताडपत्राखाली टेबल-खुर्ची असलेल्या रस्त्यावरच्या हॉटेल ला टपरी म्हणता येणार नाही पण तिथे लावलेला बोर्ड “फाय स्टार टपरी” असाच म्हणतो. त्या आय. टी कंपन्याच्या अवती पांडुरंग फडके महाविध्यालय व भवती न्यू-इंग्लिश हाय स्कूल अशी दोन ज्ञानभंडार होती. या कथेला आय. टीची भणक लागले ते फक्त एवढेच.      इयत्ता ‘अकरावी ब’ चा महेश दररोज सकाळी ९ वाजता शाळा सुरु होण्यापूर्वी टपर्यावर चहा आणि बन-मस्का खातो. खाता-खाता टपरीवाला रहीमशी गप्पा मारतो. एक दिवशी बन-मस्का खातांना या कथेची नायिका अर्थात Standard ‘9 th C’ ची विशाखा तिथे आली. तिने एक बन-मस्का मागितला. सगळ्या खुर्च्या भरल्या होत्या म्हणून रहीमने महेशला उठून विशाखाला जागा देण्यासाठी सांगितले पण ज्या क्षणापासून त्या टपर्यावर विशाखा अवतरली, अगदी त्याच क्षणापासून विशाखाच्या महिमेत महेश  दंग  झाला होता. त्याला कशाचाही भान नव्हता. “उठ रे माह्या”, पाण्याचे दोन थेंब महेशवर उडव