फाय स्टार टपरी


   
     महेश बाबुराव भोसले आणि विशाखा गणेश सहस्त्रबुद्धे यांची प्रेम प्रकरणाची सुरुवात झाली मुंबईच्या प्रत्येक आय. टी कंपन्यांच्या बाहेर असणाऱ्या टपर्यावर. या निळ्या ताडपत्राखाली टेबल-खुर्ची असलेल्या रस्त्यावरच्या हॉटेल ला टपरी म्हणता येणार नाही पण तिथे लावलेला बोर्ड “फाय स्टार टपरी” असाच म्हणतो. त्या आय. टी कंपन्याच्या अवती पांडुरंग फडके महाविध्यालय व भवती न्यू-इंग्लिश हाय स्कूल अशी दोन ज्ञानभंडार होती. या कथेला आय. टीची भणक लागले ते फक्त एवढेच.

     इयत्ता ‘अकरावी ब’ चा महेश दररोज सकाळी ९ वाजता शाळा सुरु होण्यापूर्वी टपर्यावर चहा आणि बन-मस्का खातो. खाता-खाता टपरीवाला रहीमशी गप्पा मारतो. एक दिवशी बन-मस्का खातांना या कथेची नायिका अर्थात Standard ‘9th C’ ची विशाखा तिथे आली. तिने एक बन-मस्का मागितला. सगळ्या खुर्च्या भरल्या होत्या म्हणून रहीमने महेशला उठून विशाखाला जागा देण्यासाठी सांगितले पण ज्या क्षणापासून त्या टपर्यावर विशाखा अवतरली, अगदी त्याच क्षणापासून विशाखाच्या महिमेत महेश दंग झाला होता. त्याला कशाचाही भान नव्हता.

“उठ रे माह्या”, पाण्याचे दोन थेंब महेशवर उडवत रहीमने महेशला या जगात परत आणण्याचा प्रयत्न केलामहेशला भानावर आला पण हडबडीत उठण्याच्या प्रयत्नात त्या प्लास्टिक खुर्चीची पाय वाकडी झाली आणि महेश खाली पडला. विशाखा हे दृश्य पाहून खूप खूप हसायला लागली. खाली पडलेला महेश मात्र विशाखाच्या प्रेमात वेडा झाला. विशाखाला आपण हसवलं हे विक्रम त्याच्यासाठी क्रिकेट मध्ये पहिल्याच चेंडूत षटकार मारल्यासारखं भव्य होता.

     राहीमशी माहीती काढली तेव्हा कळले की विशाखा सुध्धा अंधेरीत राहते. कदाचित त्या क्षणी या जगात सर्वात जास्त खूष महेशच होता. दहावीत बोर्डात आल्यावर सुध्धा महेश एवढा खूष झाला नसेल. दुसऱ्याच दिवशी सकाळी ९.३० वाजता शाळा असूनही सकाळी ७ वाजताच बस थांब्यावर महेश हजार होता पण जेव्हा विशाखा तिथे आली तेव्हा महेश घाबरला आणि पळून तिथे असलेल्या एका मोठ्या झाडामागे जाऊन लपला. २-३ दिवस असेच चालू राहिले पण एक दिवस महेशने धाडस करून विशाखाला एक पुसट स्माईल दिला. तिने पण महेशला रिटर्न-स्माईल दिला. कसाबसा भान आवरत महेश बसमध्ये चढला. विशाखाने इशारा करून महेशला आपल्या बाजूला बसायला सांगितले. महेश बसला आणि त्याच्या डोक्यावर विचारांचे डोंगर पडले: “आता बोलायचं तरी काय?” जिच्याशी बोलायला आपण एवढे दिवस थांबलो, ती साक्षात बाजूला बसलेली असताना तिच्याशी काय बोलायचं हेच महेशला कळेना.

“तुझं नाव काय?”, (महेशच्या डोक्यावरचं डोंगर जणु खाली ठेवत) विशाखा महेशला विचारते.

“मी म.... माह्या...नाही महेश”, महेशच्या तोंडात तुडतुडीतच का होईना, निदान शब्द आले हे त्याचे अहोभाग्य.

“तुझं काय.....नाव?”, माहित असून सुध्धा महेशने विशाखाला विचारलं आणि त्या नावाचे कौतुकही केलं.

शाळेला दोन तास आगोदर पोहचून तिथे पार्क मध्ये हिंडायचं, खायचं आणि झोपायचं हे महेशचे रोजची समयसारणी झालेली. महेश आता मित्रांपेक्षा घरातल्या आर्शेपाशी जास्ती वेळ असतो. सकाळी बस सुटेल याची नाही तर विशाखा निघून जाईल अशी रोजची गडबड असते.

     आजचा दिवस खास आहे. आज Valentine’s Day आहे. सकाळी बस मध्ये चढतांना महेश विशाखाला विचारतो, 

“आजच्या दिवसाला Valentine’s Day का म्हणतात?”

“कदाचित याने आजच्या दिवशी प्रेम शोधून काढला असेल”, विशाखा म्हणाली.

“कदाचित हा कुठलातरी बाबा असेल”, महेश बोलला.

“महेशबाबा! राहू द्या. मास्तरांना पास दाखवा”, विशाखा महेशची चेष्टा करत बोलली. मग जोरात हसायला लागली. मास्तर पण हसू लागले.

     शाळेजवळ Valentine’s Day निम्मित टीवी मराठीचे काही प्रतिनिधी आपला एक शो शूट करीत होते. शाळेजवळ म्हणता येणार कारण ते त्या आय.टी कंपन्याच्या प्रेमीयुगुलांना गंमतीचे प्रश्न विचारत होते.

“ते बघ शूटिंग”, विशाखा उद्गारली.

Valentine बाबाच्या भक्तांना विचारताहेत वाटतं काहीतरी. चल टपरीवर बसून बघू”

रहीमला दोन बन-मस्का बनवायला सांगून ते दोघे तिथे बसले. महेशला खुर्चीवरून पडल्याचं आठवला म्हणून परत खुर्ची वरून पडणार नाही याची त्यानी खात्री करून घेतली. एक ताई हातात मईक घेऊन प्रश्न विचारत होती आणि एक दादा तिच्या मागे-मागे कॅमेरा घेऊन फिरत होता. सगळ्यांना टीवीवर दिसायचं होता म्हणून त्या दादाच्या आस-पास खूप गर्दी जमा झाली होती.

“ए ती बघ आपल्याकडे येती आहे!”, विशाखा आनंदित होऊन म्हणाली.

“चल मग इकडून जाऊ आपण.”

“अररे थांबना”

“काल मी बाबांना फक्त हे विचारलं की Valentine’s Day ला Valentine’s Day का म्हणतात. तेव्हाच त्यानी दोन कानाखाली वाजवले. आता असल्या शो वर त्यांनी मला तुझ्याबरोबर पहिले तर मारूनच टाकतील”

“गप्प बस रे. चहा प्यायला येत अशणार ते कदाचित”

इतक्यात ती ताई आपला कॅमेरामन आणि गर्दी घेऊन टपरीवर पोहचली.

“नाव काय तुम्हा दोघांचं?”, महेशजवळ माईक धरून त्या तयीने विचारलं. घाबरून महेश गप्प बसला होता म्हणून विशाखाने दोघांचे नाव सांगितले.

“तू विशाखाला आजच्या दिवशी कुठे नेऊन जाणार?”, परत माईक महेशजवळ करत ताईने विचारले.

“अहो आम्ही त्या....बाबाचे भक्त वगैरे नाही आहोत. आम्हाला का प्रश्न विचारताहेत?”

“बाबा? भक्त??”

“अहो त्याला असा म्हणायचं आहे की आम्ही फक्त मित्र आहोत”, विशाखा म्हणाली.

“अच्छा, मग जर विशाखावर तुझं प्रेम असलं असता तर तू तिला कुठे घेऊन गेला असतास?”, ताईने परत प्रश्न केले.

“तसं”, महेशच्या तोंडावर जी खुषी झळकत होती तिची तुलना फक्त लहान बाळाला आपला आवडता आयस्क्रीम भेटल्यावर जो आनंद मिळतो, त्याच्याशी केला जाऊ शकतो.
“तसं काही विचार केला नाही मी पण....मी तिला कदाचित कॅन्डल लाईट डिनरला घेऊन गेलो असतो मग जुहू बीचवर हिंडलो असतो मग खूप चालून कांटाळ अलं की तिथेच बीचवर बसलो असतो आणि थंड वाहत असलेल्या वाऱ्याचा मनसोक्त आनंद लुटून घरी परतलो असतो”
महेशच्या मनातल्या भावना वाहत्या धबधब्यासारखा धो-धो वाहत असतांना ताई आणि विशाखा थक्क होऊन महेशला ऐकत होते.

“खूप छान. तुला हे घे heart shaped pillow आणि तिला पण दे”, असं म्हणून त्या ताईने महेशच्या हातात तो हृदय दिला. ताईच्या वाक्याचे दुहेरी अर्थ महेशला कळलं होतं.

“नक्की देणार”, महेश हसून बोलला.

टीवीवाले गेले पण महेश गप्प बसला होता. विशाखा समोर आपल्या भावना कसे ठेवायचे हेच त्याला कळेना.

“मग, घेऊन जाशील मला कॅन्डल लाईट डिनरला?”, विशाखा लाजत म्हणाली.

“नक्की! हे घे तुला”, असं म्हणत महेशने तो heart shaped pillow तिला दिला. ताईने म्हणाल्याप्रमाणे महेशने आपला heart आणि heart shaped pillow दोन्ही विशाखाला दिले.
अशीच झाली पांडुरंग फडके महाविध्यालय आणि न्यू-इंग्लिश हाय स्कूलचा हा प्रेमप्रकरण संपन्न व्हाया फाय स्टार टपरी आणि हे सगळं सांगणारा मी कोण? मीच महेश बाबुराव भोसले.

Popular posts from this blog

Madhya Pradesh: A Hearty Affair

Stories by the Tracks

Kerala Diaries - Moonu