Posts

Showing posts from February, 2012

बगिचा

Image
"ए झिपऱ्या, पाटील बोलावतोय तुला", मावशी ओरडली . माझं नाव सदाशिव सोनोपंत माने. मला सगळे लोक प्रेमाने किवा रागाने ' झिपऱ्या ' असं म्हणतात . मी पण प्रेमाने किवा रागाने 'होऽऽ' असं उत्तरतो. पाटल्याचा नेहमीचा असतं काहीतरी काम - ''दूध आण" - ''कुत्र्याला फिरवून आण" - "हे आण ते आण", नुसता कटकट आहे हा पाटील. मी नाही जाणार आज त्या पाटलाकडे, मारू द्या बोंबा. मावशी परत आली . तिला पाहताच पटकन बोललो, "ए मावश्या, मला नाही जायचं त्याच्याकडे. मी नाही जाणार. या पुढे त्याचं काहीही काम असेल तर मला नको बोलत जाऊ." मग काय? दोन फटके मारून पाठवलाच मला त्या पोपटाकडे. मार खातांना राधा पण होती तिकडेच. मावशी पण येडी आहे. राधा समोर का मारायचं मला?
राधा आणि मी शाळेत एकत्र आहोत. नऊवीत. राधा याच वर्षी गावात आली. पुण्यात रहायची आतापर्यंत. मला राधा खूप आवडते. जितका सहजतेने हे मी तुम्हाला सांगितलं, तितकाच कठीण आणि असंभव वाटतं जेव्हा तिला हीच बात बोलायचा प्रयत्न करतो. तिला पहिल्यांदा शाळेत पाहिला तेव्हाच मी ठरवलं की लग्न करेन तर हिच्याशीच नाही त…